Minister Dada Bhuse warning bank officers over farmer’s blocked savings account in Hingoli. Saam Tv
Video

...अन्यथा 5 मिनिटांत बँकेत आलो, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मंत्री दादा भुसे भडकले, VIDEO

Dada Bhuse Warning To Bank Officer: हिंगोलीमध्ये शेतकऱ्याने बँकेने बचत खात्याला होल्ड लावल्याची तक्रार मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. यावर संतप्त होऊन दादा भुसे यांनी बँक अधिकाऱ्याला फोनवर दम दिला आणि पाच मिनिटांत होल्ड काढण्याचे आदेश दिले.

Omkar Sonawane

हिंगोलीमध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी औंढा तालुक्यातील वसई गावचे शेतकरी प्रताप मगर यांनी बँक व्यवस्थापनाने बचत खात्याला होल्ड लावला असून पीक कर्ज भरल्याशिवाय बचत खात्यातील रक्कम देणार नसल्याची कैफियत दादा भुसे यांच्याकडे मांडली. यावरती संतप्त झालेल्या दादा भुसे यांनी बँक अधिकाऱ्याला फोन करत पाच मिनिटाच्या आत शेतकऱ्याच्या बचत खात्याला लावलेला होल्ड काढा अन्यथा स्वतः आपण बँकेत येऊ असा दम बँक अधिकाऱ्याला दिला. त्यानंतर तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रताप मगर यांच्या बचत खात्याला लावलेला होल्ड काढत शेतकऱ्याची रक्कम त्याला दिली आहे.

धक्कादायक म्हणजे या शेतकऱ्याचा भाऊ रुग्णालयामध्ये भरती आहे आणि त्याच्या भावाला लागणारी रक्कम काढण्यासाठी तो हिंगोलीच्या युनियन बँकेत गेला होता. तिथे मात्र बँक अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे खरीप हंगामातील पेरणीसाठी काढलेले थकीत कर्ज बाकी आहे. त्यामुळे तुमचे सर्व पैसे होल्ड केल्याची माहिती दिली त्यानंतर अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याने मंत्री दादा भुसे यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार मांडली, आणि त्यानंतर मंत्री दादा भुसे संतप्त झाले, दादा भुसे यांनी साम टीव्ही च्या प्रतिनिधी सह शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडीमध्ये बसून बँकेकडे धाव घेतली. मात्र, मध्येच बँक अधिकाऱ्यांनी होल्ड काढला आहे अशी माहिती दिल्यानंतर दादा भुसे यांनी आपला ताफा पुन्हा पुढील दौऱ्याकडे वळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT