VIDEO: दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी Saam TV
Video

VIDEO : दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी

Milk Farmer Protest News: दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा दुध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जून पासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असून अधिवेशन काळात सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. गेले वर्षभर दुध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून दुध उत्पादक शेतकरी दुध देत आहेत. दुध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 35 रुपये दर द्यावा, बंद केलेले दुध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च आणि तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर 10 रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दुध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असा इशारा देखील संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT