Special Report : म्हाडाची बनावट वेबसाईट! बोगस वेबसाईटवरून अर्जदारांची फसवणूक SAAM TV
Video

Special Report : म्हाडाची बनावट वेबसाईट! बोगस वेबसाईटवरून अर्जदारांची फसवणूक

Mhada House News : सायबर ठगांनी म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहुब कॉपी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण म्हाडाची बनावट वेबसाईट बनवण्यात आलीय. या वेबसाईटवरून अर्जदाराची 6 लाखांची फसवणूक झालीय. मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची फसवणूक होतेय, म्हाड्याच्या घरासाठी अनेकांनी फॉर्म भरला आहे, परंतू सायबर महाठगांनी चक्क म्हाडाच्या वेबसाईची हुबेहुब कॉपी बनवल्याचे उघड झाले आहे.

मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं त्यासाठी म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन अनेकांनी नोंदणी देखील केली असेल, परंतू काही सायबर ठगांनी म्हाडासारखीचं mhada.org या वेबसाईटची 'सेम टू सेम' कॉपी बनवल्याचे उघड झाले, स्वत: म्हाडाच्या आयटी विभागाने याबाबतची तक्रार सायबर सेलकडे नोंदवली आहे.या फेक वेबसाईच्या माध्यमातून काही लोकांना गोरेगावमधील घरे दाखवण्यात आली, त्यानुसार पैशांची मागणी केली असता एका व्यक्तीने 6 लाखांची रक्कम भरल्यानंतर घराचा ताबा हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT