metro gold line Saam Tv
Video

मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुसाट होणार! २ एअरपोर्ट जोडणार, २० स्टेशन; कसा असणार मेट्रो-8 प्रोजेक्ट? VIDEO

Metro 8 Gold Line Mumbai to Navi Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मेट्रो 8 गोल्ड लाईन मार्ग 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे.

Omkar Sonawane

  • मेट्रो 8 गोल्ड लाईन मुंबई व नवी मुंबई विमानतळाला थेट जोडेल

  • 34.89 किमी लांबीचा हा मार्ग 20 स्थानकांचा असेल

  • 20 हजार कोटी खर्चाचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार

  • सिडकोने डीपीआर सरकारकडे सादर केला आहे

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आणि प्रलंबित नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मेट्रोचा गोल्ड लाइन मार्ग सामोर आला आहे. सरकारच्या निर्देशानुसार सिडकोने या महत्वाच्या मार्गाचा डीपीआर म्हणजेच अहवाल तयार करून तो सरकारला सादर केला आहे. येणाऱ्या काही महिन्यांत त्याला मंजूरी मिळेल असा निर्धार सिडकोचे व्यवायस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बाकीच्या कामांना गती मिळताना दिसतेय. त्यासाठी मेट्रो 8 गोल्ड लाईन हा मार्ग नियोजित केला आहे. या मार्गाच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी सिडकोला देण्यात आली आहे.

असा असेल मेट्रो 8 गोल्ड लाईन

मार्गाची संपूर्ण लांबी सुमारे 34.89 किमी

नवी मुंबई क्षेत्रातील मार्गाची लांबी 21 किमी

संपूर्ण मार्गावर 20 स्थानके, 6 भूमिगत स्थानके

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 व नवी मुंबई विमानतळ या दोन स्थानकांना थेट जोडला जाणार आहे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च 20 हजार कोटी असून 2029 पर्यंत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

SCROLL FOR NEXT