vijay wadettiwar claims bjp corporators in touch saam tv
Video

Mayor Election : राजकारण फिरणार! काँग्रेस फोडणार भाजपचे नगरसेवक?

Mayor Election: Congress Claims BJP Corporators in Touch in Chandrapur : चंद्रपुरात सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे. भाजप नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Nandkumar Joshi

मुंबई आणि ठाण्यात भाजप-शिंदेसेनेत सत्तासंघर्ष सुरू असून, महापौर कोण होणार यावरून पेच वाढलेला असतानाच, चंद्रपुरातील सत्तास्थापनेचा पेच देखील आणखी वाढलाय. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. चंद्रपुरातील भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा धक्कादायक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तर भाजपच्या नगरसेवकांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलंय, असं विधानही त्यांनी केलं आहे.

याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा महापौरच होईल अन्यथा विरोधी पक्षात बसू. काँग्रेसचे काही नगरसेवक आहेत, त्यांना वाटलं तर, भाजपसोबत यावं. ते यशस्वी किती होईल हे येणारा काळच ठरवेल, असे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याबाबतच्या चर्चांवर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. त्यावर काँग्रेसचे नाही तर भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात असण्याचा प्रश्नच नाही. हे काहीतरी हवेत बाण मारण्याचा प्रकार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT