Sanjay Raut addressing the press as Maha Vikas Aghadi announces a massive EC protest on November 1 in Mumbai. Saam Tv
Video

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Maharashtra Political Protest Against EC: निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि इतर प्रमुख पक्षांनी मुंबईमध्ये १ नोव्हेंबरला विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली.

Omkar Sonawane

आज महाविकास आघाडी आणि इतर पक्षांची शिवसेना भवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, कॉँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी उपस्थित होते.

1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि इतर पक्षांकडून मुंबईमध्ये विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात लढाई लढतो आहे. यामधून काय निष्पन्न होईल माहीत नाही. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीने घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे.

मतदार याद्या पवित्र असायला हव्यात. त्यासाठी सर्व प्रमुख पक्ष लढत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी शनिवारी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा निघेल. या मोर्च्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आणि कॉँग्रेसचे जेष्ठ नेते करतील. 1 नोव्हेंबेर हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा असेल असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT