MASSIVE FIRE IN YEOLA saam tv
Video

आगीचा तांडव! भंगाराच्या गोडाऊनसह 4 घरं जळाली, परिसरात खळबळ|VIDEO

Yeola Scrap Godown Massive Fire Latest News: नाशिकच्या येवला शहरातील अंबिया शहा कॉलनीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीने शेजारील चार घरांनाही वेढले असून, मनमाड आणि निफाडसह विविध ठिकाणच्या अग्निशमन दलांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Sonawane

नाशिकच्या येवला शहरातील अंबिया शहा कॉलनी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील भंगाराच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून, शेजारीच असलेल्या चार घरांनाही आगीने वेढले आहे. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने आग विझवण्यासाठी नागरिकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मनमाड, निफाड यांसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत गोडाऊनसह चार घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

Hair Care: मऊ आणि शायनी हेअर पाहिजेत? मग केस धुण्याआधी 'हा' घरगुती हेअस मास्क नक्की लावा

Newly Married Bride: लग्नानंतर नव्या नवरीने सासरी गेल्यावर करू नयेत या चुका; सुखी संसारासाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

महिला कलेक्टरला अश्लील मेसेज; सत्ताधारी आमदाराला अटक, राजकारणात खळबळ

Nail Health : नखांचा रंग आणि आकार बदलतोय? शरीरात लोहाची कमतरता असल्याचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT