Firefighters battle massive blaze at Ghatkopar’s Gold Crush building while residents are being rescued. Saam Tv
Video

घाटकोपरमध्ये अग्नितांडव! गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू|VIDEO

Ghatkopar Blaze: मुंबईच्या घाटकोपर परिसरातील गोल्ड क्रश इमारतीत भीषण आग लागली आहे. इमारतीत अनेक नागरिक अडकले असून, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिस बचाव कार्य करत आहेत.

Omkar Sonawane

मुंबईतील घाटकोपर येथे उच्चभ्रू इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घाटकोपर परिसरातील गोल्ड क्रश इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. या आगीत काही नागरिक इमारतीत अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव आणि आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीचा फैलाव आणि धुराचा प्रचंड लोट यामुळे रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT