Fire brigade personnel douse flames at Star Mall in Dadar, Mumbai; rescue operations continue after a major blaze erupted this afternoon. Saam Tv
Video

दादरमधील स्टार मॉलला भीषण आग; अग्निशमन दलाचं बचावकार्य सुरू|VIDEO

Mumbai Fire Brigade Rescue Operation In Dadar Mall: मुंबईतील दादर परिसरातील स्टार मॉलमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Omkar Sonawane

मुंबईतील दादर परिसरातील स्टार मॉल मध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचं समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला. तत्काळ अग्निशमनदलाच्या तब्बल 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. बचावकार्य सुलभ व्हावं यासाठी अग्निशमन दलाने मॉलच्या काचा फोडून आत प्रवेश केला आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, मिळालेल्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमनदलाचा ताफा तैनात असून,परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT