Markadwadi Issue In Legislative Assembly saam Tv
Video

Vidhan Sabha: विधानसभेत उमटले मारकडवाडीचे पडसाद; विशेष अधिवेशनात EVMवरून रणकंदन

Markadwadi Issue In Legislative Assembly : विधीमंडळाचं विशेष अधिवेशन पहिल्याच दिवशी ईव्हीएम आणि मारकडवाडीच्या मुद्यावरून गाजलं. मारकडवाडीच्या ग्रामस्थांना मतपत्रिकेवर मतदान करण्याची परवानगी न दिल्याच्या निषेधार्ध विरोधी पक्षांनी आमदारकीच्या शपथेवर बहिष्कार घातला. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ईव्हीएमवरून विरोधकांचा समाचार घेतला. नेमकं काय घडलं त्यावरचा हा रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभेच्या निकालानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो विरोधकांच्या बहिष्कारास्त्रामुळे. मारकडवाडीत मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करत आंदोलकांची धरपकड केलीय. या प्रकरणी महाविकास आघाडीने थेट सभात्याग करत नव्या आमदारांच्या शपथविधीवरच बहिष्कार टाकलाय. तसंच ईव्हीएमवरून सरकारवर हल्लाबोल केलाय.

तर महाविकास आघाडीचे नेते रडीचा डाव खेळत असल्याची टीका अजित पवारांनी केलीय.दरम्यान निवडणूक आयोग मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास तयार झाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाऊ, अशी भूमिकाच माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनी घेतलीय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवलाय... मात्र त्यानंतर सरकार आता मारकडवाडीतील ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT