avinash-jadhav Saam TV News Marathi
Video

Marathi Morcha : मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडलं, पहाटेच घरातून घेतलं होतं ताब्यात

Avinash Jadhav : अविनाश जाधव यांना राहत्या घरातून आज पहाटे ताब्यात घेण्यात आले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्यांना सोडण्यात आलेय.

Namdeo Kumbhar

Avinash Jadhav News : मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अखेर सोडले आहे. मंगळवारी पहाटे त्यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले होते. मीरा रोड, मीरा भाईंदर येथील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांना ताब्यात घेण्यात आले होते. मीरा रोडमध्ये आज मोर्चा निघणार होता, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण अविनाश जाधव मोर्चावर ठाम होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लोकांचा रोष आणि राग संताप पाहिल्यानंतर त्यांना आज सोडण्यात आले.

अविनाश जाधव काय म्हणाले?

मला ताब्यात घेण्यापेक्षा आजचा मोर्चा निघणं हे महत्त्वाचं होतं. ते मराठी माणसांनी करुन दाखवलंय. मी मीरा रोडच्या लोकांचं आभार मानतो. मराठीचा माज काय हे दाखवून दिलं आहे, असे जाधव म्हणाले. मला अटक केली नसती तर मोर्चा प्रचंड मोठा झाला असता. मराठी लोकांच्या विरोधात मोर्चा निघत असेल तर मोठा मोर्चा झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली फेकली हे काही योग्य नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही, असं जाधव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

12 हजारांचं तिकीट, पण पदरी निराशाच; मेस्सीमुळे कोलकत्यात गोंधळ

19 Minute 34 Seconds Viral Video Link : 19 मिनिटांचा व्हायरल MMS VIDEO खरा की खोटा? महत्वाची माहिती आली समोर

सिडकोची १९,००० हजार घरांसाठी लॉटरी; मुदत १० दिवसांनी वाढवली,नवी मुबंईत कुठे असतील घरं?

बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्री गणेश नाईकांचा दावा हास्यास्पद?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

SCROLL FOR NEXT