Marathi Language Compulsory In School Saam Tv
Video

Marathi Language GR: शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा! सरकारचा पुन्हा नवा जीआर, आतातरी अंमलबजावणी होणार का?

Girish Nikam

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' कवी सुरेश भट यांच्या या ओळी मराठी भाषेची श्रीमंती अधोरेखीत करतात. मात्र आपल्याच राज्यातल्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषयाला सापत्नतेची वागणूक दिली जाते. मात्र सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे इंग्रजी शाळांनी नियम आणि कायदे नेहमीच धाब्यावर बसवून मराठीचा तोंडी लावण्यापुरता वापर केला जात होता. मात्र आता सरकारनं कडक पावलं उचलली आहेत.

राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेतली जाईल. श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता आता गुणांकन पद्धतीने म्हणजेच मार्क्स देऊन मराठी विषयाच्या परीक्षेचे मूल्यांकन केले जाणार आहे.

आतापर्यंत इंग्रजी माध्यमांतील शाळांमध्ये मराठी भाषा विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी दिली जायची. मात्र त्यामुळे मराठीचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने होत नसल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे सरकारनं नव्यानं जीआर काढून मराठी सक्तीची केलीय. यापूर्वीही असे अनेकदा जीआर काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा नवा जीआर इंग्रजी शाळा किती गांभीर्यानं घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA Meeting : जागावाटपाबाबत मविआची बैठक सुरू

Maharashtra News Live Updates: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना हवं बिहार मॉडेल? जागावाटपाचाही दिला नवा प्रस्ताव, काय आहे सत्तेचं हे मॉडेल? वाचा...

Breaking News : नंदुरबारमध्ये दोन गटांत तणाव, तुफान दगडफेक; पहा Video

Shivdeep Lande : रीअल लाइफ सिंघम शिवदीप लांडे यांच्याविषयी ही गोष्ट माहीत आहे का?

SCROLL FOR NEXT