Actor Ritesh Deshmukh appeals for peaceful resolution of Maratha reservation protest, prays for Manoj Jarange’s health. Saam Tv
Video

Ritesh Deshmukh Prays For Manoj Jarange: मराठा आंदोलनावर तोडगा काढावा; रितेश देशमुख यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट|VIDEO

Ritesh Deshmukh Appeals For Resolution To Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल काळजी व्यक्त करत सरकारने तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू

अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर आंदोलकांना पाठिंबा दर्शवला

त्यांनी मनोज जरांगे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली

सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी रितेश देशमुख यांची अपेक्षा

ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे लाखोंच्या संख्येने मुंबईत तळ ठोकून आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेय आणि जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे आणि मराठा बंधावांनी घेतला आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रितेश देशमुख म्हणाला, सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, रितेश देशमुख म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

New Labour Code: वर्षभरात ग्रॅच्युटी, बेसिक सॅलरी वाढणार; बुधवारपासून नवा कामगार कायदा,वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

रूपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शननंतर राज्यात पुन्हा खळबळ; नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT