Maratha Protest Saam Tv
Video

Maratha Protest: मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये शाहू महाराजांची एन्ट्री, थेट सरकारलाच दिला इशारा

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना खासदार शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला. यावेळी शाहू महाराजांनी सरकारला इशारा दिला. सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.

Priya More

मराठा आंदोलनामध्ये खासदार शाहू महाराज यांनी एन्ट्री घेतली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यासंदर्भात त्यांनी परिपत्रक काढत थेट सरकारलाच धारेवर धरले आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांचे परिपत्रक मनोज जरांगे यांना दिले. तसंच यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली.

आंदोलनाची नोंद गांभीर्याने घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवावी हा आम्ही पर्याय सुचवला होता. घटनेमध्ये दुरूस्ती करावी जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल. नोकरी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण दिल्याशिवाय मराठा थांबणार नाही, असा इशारा शाहू महाराज यांनी दिला आहे. सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT