Manoj Jarange showered with gulal during grand celebration of Maratha reservation victory at Antarwali Sarati. Saam Tv
Video

Manoj Jarange: मराठ्यांनी 96 टक्के लढाई जिंकली; मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवालीत जल्लोष|VIDEO

Historic Moment: मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत मराठा आरक्षणाच्या ९६% विजयाचा आनंद व्यक्त केला. विविध समाजघटकांच्या पाठिंब्यामुळे ही लढाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

मराठा समाजाने आरक्षणाच्या लढाईत ९६% विजय मिळवला.

सरकारने हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश जाहीर केला.

आंतरवली सराटीत गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला.

जरांगे पाटील यांनी विविध समाजघटक आणि पत्रकारांचे आभार मानले.

मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने जाहीर केल्यानंतर आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी दलित, मुस्लिम, आदिवासी, जैन, मारवाडी, मायक्रो ओबीसी यांसह इतर समाजघटकांनी या लढाईत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. विशेषत: पत्रकारांनी समाजाची बाजू ठामपणे मांडल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

जरांगे म्हणाले, आमच्या आई-बहिणींना मारहाण झाली, गोळ्या झाडल्या गेल्या तरी लोक मागे हटले नाहीत. त्या ताकदीमुळेच ही लढाई यशस्वी झाली. लढाईला मिळालेल्या या यशामुळे आंतरवली सराटीत दिवाळी साजरी करण्यात आली. गावभर गुलालाची उधळण झाली, जेसीबीवरून जरांगे यांच्यावर गुलाल वर्षाव करण्यात आला. मराठ्यांनी ९६ टक्के लढाई जिंकली आहे, असा आनंद त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

Prajakta Mali: जांभळ्या साडीत प्राजक्ताचं मराठमोळ सौंदर्य...

Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

SCROLL FOR NEXT