Maratha Protesters Attempt to block Ajit Pawars convoy Saam Tv
Video

Maharashtra Politics : सोलापूरात तणावाचं वातावरण; मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला, पाहा VIDEO

Maratha Protesters Attempt to block Ajit Pawars convoy : मोहोळमध्ये मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला. सोलापूर जिल्ह्यात मोठं तणावाचं वातावरण आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : सोलापुर जिल्ह्यातील मोहोळमध्ये मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय. मोहोळमधील अनगरनगर पंचायत पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन झालंय. यावेळी कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती. सोलापुरात अजित पवारांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आज मराठा आंदोलकांनी केलाय.

मोहोळमध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनगर ते मोहोळ दरम्यान अजित दादा यांच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती. मराठा आंदोलकांनी यावेळी 'एक मराठा लाख मराठा' अशी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Maharashtra Live News Update : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मनाने राष्ट्रवादीत; राम सातपुते यांचा खोचक टोला

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

Maharashtra Government : राज्यातील गुंठेवारीला अधिकृत परवानगी, राज्यपालांचा अध्यादेश

SCROLL FOR NEXT