मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा बांधवांच्या वाढत्या पाठिंब्यामुळं जरांगेंच्या आंदोलनाची धार आणखी वाढली आहे. जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला. महामार्गावरील वडीगोद्री फाट्याजवळ त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ महामार्गावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरळीत झाली.
मनोज जरांगेंचे आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा समाजाकडून जरांगेंच्या उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी आंतरवाली सराटी फाट्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उपोषणस्थळी मराठा बांधवांची गर्दी होईल, अशी सुरुवातीला अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.