सोलापूरच्या माढा येथे मराठा आंदोलकानं सहकारमंत्र्यांची कार अडवली.  Saam TV
Video

Maratha Protest : मराठा आंदोलक आक्रमक; सहकारमंत्र्यांची कार अडवली, कारखाली घुसण्याचा प्रयत्न, VIDEO

Maratha agitators stop Cooperation Minister Babasaheb Patil's car in Madha : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा वातावरण तापलंय. सोलापूरच्या माढ्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची कार आंदोलकांनी अडवली.

Nandkumar Joshi

भरत नागणे, पंढरपूर | साम टीव्ही

आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडं, राज्याच्या विविध भागांतून आंदोलक उपोषणस्थळी जात आहेत. सोलापूरच्या माढ्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले. एका मराठा आंदोलकानं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला. सहकार मंत्री न थांबल्यानं आंदोलक कारच्या मागे पळू लागला. तसेच कारखाली घुसण्याचा देखील प्रयत्न केला.

बापू गायकवाड असं या मराठा आंदोलकाचे नाव असून, सहकार मंत्री पाटील यांच्या कारमागे पळत जाऊन तिच्याखाली घुसण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, तसेच एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून मराठा आंदोलक गायकवाड याला थांबवलं. त्यानंतर सहकार मंत्र्यांचा ताफा पुढे तुळजापूरच्या दिशेने रवाना झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठा आंदोलनासाठी निघाले अन् नियतीने घात केला! बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

Maharashtra News Live Update: कारच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

Dal Benefits : गॅस, अ‍ॅसिडिटी टाळायचीय? मग डाळ निवडताना डॉक्टरांचा हा सल्ला दुर्लक्षित करू नका

Emraan Hashmi Health: इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण, रांचीवरून परत येताच प्रकृती बिघडली; चाहते चिंतेत

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला केंद्र सरकारची मंजुरी! कुठून कुठे धावणार? कसा आहे नवा मार्ग?

SCROLL FOR NEXT