Maratha activists surrounding Revenue Minister Chandrashekhar Bawankule in Tuljapur during a protest over reservation demand. Saam Tv
Video

मराठा कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव, म्हणाले- मनोज जरांगे पाटलांना...; पाहा व्हिडिओ

Maratha activists gherao Chandrashekhar Bawankule: तुळजापूरात मराठा कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

Omkar Sonawane

  • तुळजापूरात मराठा कार्यकर्त्यांनी मंत्री बावनकुळे यांना घेराव घातला.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू.

  • कार्यकर्त्यांनी सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव टाकला.

  • बावनकुळे यांनी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

तुळजापुरात आज मराठा कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालत आपली मागणी मांडली. कार्यकर्त्यांनी मंत्री बावनकुळे यांना निवेदन देत म्हटले की, मनोज जरांगे पाटलांना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. सरकार मराठ्यांचा अंत पाहत आहे का? असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मंत्री बावनकुळेंना त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारले. यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मराठा समाजासोबत सरकार ठामपणे उभे आहे. मराठा आरक्षणाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणावर कायम चर्चा सुरू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT