Manoj Jarange SaamTv
Video

Manoj Jarange Patil : 'आमचं वाटोळं करून तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही'; जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा !

Saam Tv

आंतरवालीमध्ये 20 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये आपण समाजातील बांधवांना आपण उमेदवार पाडायचं का उभं करायचं याबद्दल विचारणा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याचं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. विधानसभा इच्छुक उमेदवारांशी उद्या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मी चर्चा करणार आहे. ज्या बांधवांनी अर्ज केले आहे, त्यांनी उद्या चर्चेसाठी यावं. पण उद्या चर्चेला आलेल्यांनी आपलं तिकीट फायनल झालं असू समजू नका, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, मराठ्यांचे वाटोळे करुन तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. मविआंच्या नेत्यांपेक्षा महायुतीने मराठा समाजाला हीन वागणूक दिली आहे. सत्ताधाऱ्यांच्या मागे ओबीसी उभे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना कोण निर्णय घेऊ देत नाही हे समजत नाही, असंही यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या हरियाणा दौऱ्यावर

Shyam Manav: श्याम मानव यांच्या व्याख्यानात राडा; कार्यक्रमात भाजप युवा कार्यकर्त्यांचा गोंधळ, पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: आचारसंहिता लागू झाल्यावर निधी दिला का? आम्ही तपास करू; लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचं मोठं वक्तव्य

Raigad : रायगड मधील 'या' थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ

SCROLL FOR NEXT