मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाच्या तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचा आरोप त्यांनी फडणवीसांवर केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतरही मराठा आरक्षणावर कोणताच निर्णय महायुती सरकारने घेतला नसल्याने त्यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर टीकेची झोड केली आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी, 'देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे आयुष्य बेचिराख केले आहे. मराठा समाजाने या लोकांना सत्तेत बसवले. पण त्यांनीच मराठा समाजाच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे काम केले. त्यामुळे समाजाने या निवडणुकीत 100 टक्के मतदान करून या सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. आपल्या समाजाची प्रतिष्ठा जपावी. या सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला बेदखल करण्याचे काम केले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांची आशा आकांक्षा संपवली. त्यांनी मराठा समाजा तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम केलं', असं म्हंटलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी सत्तेचा वापर मराठ्यांविरोधात केला. त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण न देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या खेळीमुळे मराठा समाजाची मुले आरक्षण, शिक्षण व नोकरीपासून वंचित राहिले. फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम केलं. त्यांनी मराठ्यांच्या शेपटीवर पाय ठेवण्याचं काम केलं आहे, असं देखील मनोज जरांगे म्हंटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.