Vadigodri News Saam Tv
Video

Jalna Breaking : वडीगोद्रीत पुन्हा राडा, मराठा-ओबीसी आमने सामने; VIDEO

Maratha - OBC : मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केल्यानं ओबीसी आंदोलकदेखील घोषणाबाजी करत आहेत. अंतरवाली फाट्यावर वडीगोद्री येथे सध्या तणावाच वातावरण पाहायला मिळत आहे.

Saam Tv

अंतरवाली सराटी फाट्यावर वडीगोद्री येथे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येऊन घोषणाबाजी करत आहेत. याठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त असतानाही मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने येत आहे. अंतरवाली सराटीच्या रस्त्यालाच लक्ष्मण हाके यांच आमरण उपोषण स्थळ असल्याने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत येत आहे त्यामुळं गोंधळ होत आहे.

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला होता. मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांची वाहने पोलिसांनी बॅरिकेट्स लावून अडवली. त्या ठिकाणी काही ओबीसी बांधव देखील होते. यावेळी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक यांनी ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT