Manoj Jarange vs Dhanjay Munde  Saam TV marathi news
Video

Jarange vs Munde : धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली, मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Manoj Jarange Accuses Dhananjay Munde of ₹2.5 Crore Murder Conspiracy : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अडीच कोटी रुपयांची सुपारी देऊन आपली हत्या करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत आरोपांचा सपाटा लावला. त्यांनी अजित पवार यांना विनंती करत धनंजय मुंडेंना पक्षात ठेवू नये, असी विनंतीही केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. 'माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असून, माझ्याकडे ऑडिओ क्लिपसह सर्व पुरावे आहेत,' असा थेट दावा जरांगे यांनी केला आहे. आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीने अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप मुंडेंवर त्यांनी केला. आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग, मेसेज आणि इतर पुरावे असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी सरकार आणि पोलिसांकडे केली आहे. जरांगे यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण लागले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या वैशालीनगर परिसरातील एका टायरच्या गोदामाला आग

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT