मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. saam tv
Video

Manoj Jarange Protest : मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, नेमके काय म्हणाले?

Devendra Fadnavis reaction on Manoj Jarange protest : मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली आहे. तरीही ते मुंबईत येण्यावर ठाम आहेत. आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करतानाच, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.

Nandkumar Joshi

सागर आव्हाड, पुणे | साम टीव्ही

मेलो तरी मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगेंनी मुंबईत जाणारच असा निर्धार केला आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी केलेल्या १३ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. एक मागणी आहे. तिला असलेली कायदेशीर अडचण त्यांना सांगितली आहे. राज्य सरकारने नेहमीच चर्चा केली आहे. चर्चेची दारे उघडी ठेवली आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. उपोषण नंतरही करता येईल. मुंबई, पुण्यात गणेशोत्सव सुरू आहे. मोठा उत्सव असतो. लोक मोठ्या संख्येने येतात. अशावेळी जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय घेऊ नये. कुठेही ताण येईल अशी भूमिका त्यांनी घेऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं.

अनेक दिवस त्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे. त्यांना अॅडमिट व्हायला हवे. रुग्णालयात उपचार घेतले पाहिजेत, असे आमचे मत आहे. सरकार खुल्या मनाने सगळ्याच गोष्टी मान्य करत आहे. मग मुंबई, पुण्याला येऊन या ठिकाणी गणेशोत्सव काळात ताण येईल असा निर्णय घेऊ नये, असेही ते म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीवरही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले. सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यानंतर मोठा खंड पडला आहे. शेतकऱ्यांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा झालीय. एनडीआरएफ नियमानुसार, ५ ऑक्टोबरपर्यंत सर्व्हे करता येत नाही. पण तोपर्यंत प्राथमिक सर्व्हे आम्ही करतोय. कुठलाही भाग असो, त्या शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार आहोत. श्री गणेशाच्या आशीर्वादाने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासन फडणवीसांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात शासकीय धान गोडाऊनमधील तांदळाची चोरी

High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT