Manoj Jarange Patil addressing the media on Maratha-Dhangar unity and Thackeray alliance rumors in Mumbai. Saam Tv
Video

Manoj Jarange: मुंबईत ठाकरे पाहिजेत ही जुनी म्हण, पण... जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? VIDEO

Political Reaction From Manoj Jarange On Thackeray Alliance: मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की मराठा व धनगर समाज वेगळे नाहीत. ठाकरे एकत्र आल्यास आमचं काही बिघडत नाही, असं सांगत त्यांनी टोलेबाजी करत मुंबईत ठाकरे पाहिजे या म्हणीवर भाष्य केलं.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की मराठा आणि धनगर समाज वेगळे नसून, ते एकच आहेत. आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढेही होणार नाही, असं ठाम सांगत त्यांनी धनगर समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्याचे स्वागत केले. मराठा आरक्षणाच्या मागणीला धनगर समाजाने विरोध केला, असा गैरसमज निर्माण केला जात असून, त्यांना कारण नसताना विरोध केल्याचं आम्हाला वाटत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं काही बिघडत नाही, असं सांगत त्यांनी हलकीशी टोलेबाजी केली. मुंबईत ठाकरे पाहिजे ही जुनी म्हण आहे, पण ती कशासाठी होती हे माहीत नाही. लोकांची इच्छा आहे दोघे एकत्र यावेत मग येऊ द्या. आमचा काही फायदा नाही, पण लोकांनी म्हटलंय म्हणून एकदा होऊन जाऊ द्या अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

Latur Band : छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण, राज्यात पडसाद, आज लातूर बंद

Horoscope Monday Update: कामिका एकादशीचे व्रत फलदायी ठरेल, प्रगतीची आस राहील; आजचे राशीभविष्य

Morning Breakfast Recipe : व्यायामानंतर भरपूर भूक लागते? फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' पौष्टिक नाश्ता

Amitabh Bachchan : व्हिडीओ काढणाऱ्या पापाराझींवर अमिताभ बच्चन भडकले, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT