Manoj Jarange speaking to media about Maratha reservation and farmer relief demands. Saam Tv
Video

Manoj Jarange: मराठा आरक्षण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; मनोज जरांगे नेमकं काय काय म्हणाले? EXCLUSIVE VIDEO

Hyderabad Gazette GR: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्हीला मुलाखत देत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीमुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावे अशी मागणी केली.

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे बांधव हे मुंबईमध्ये तळ ठोकून होते. यानंतर सरकारने तातडीने हैदराबाद गॅझेटियरनुसार जीआर काढला आणि ज्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असे सांगितल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला होता. मात्र यावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला असून हा जीआर रद्दा करावा अशी सरकारकडे मागणी केली आहे. तसेच या जीआरला हायकोर्टात देखील आव्हान दिले होते. काल देखील दसरा मेळाव्याच्या मंचावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ओबीसीच्या ताटातले दुसऱ्यांच्या ताटात जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार केला.

गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि सोलापूर तसेच राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे पीक भुईसपाट केलेय. बळीराजा हा संकटात सापडला असून त्याच्या तोंडाशी आलेला घास ओढवल्याने शेतकरी हा संकटात आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे मदतीची जोरदार मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे विमानतळावर विमान अपहरणाचे "मॉक ड्रिल"

Cough Syrups : २ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; मृत्यूतांडवानंतर केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायजरी!

Maharashtra Politics: उद्याची ओबीसी बैठक वादळी ठरणार? दोन राजकीय विरोधक आमने सामने येणार|VIDEO

Thackeray Vs Fadnavis : उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट! CM फडणवीसांची जहरी टीका, काय होती १००० रुपयांची पैज?

Viral News : आईच्या पश्चात पिलांना मायेची ऊब देणारा कोंबडा; पिलांचं सांभाळ करणाऱ्या कोंबड्यांचे कौतुक

SCROLL FOR NEXT