Mallikarjun Reddy Expelled from BJP saam tv
Video

Mallikarjun Reddy : भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डींची पक्षातून हकालपट्टी; निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई

Mallikarjun Reddy Expelled from BJP : भाजपने मल्लिकार्जुन रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने ही कारवाई केल्याचे मानले जाते.

Saam Tv

ब्रिजमोहन पाटील, रामटेक

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं मोठी कारवाई केली आहे. भाजपचे रामटेकमधील स्थानिक नेते मल्लिकार्जुन रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला रेड्डी यांनी जाहीरपणे विरोध केला होता. जयस्वाल यांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती. त्याला रेड्डींनी विरोध केला होता. तोच विरोध करणं रेड्डींना महागात पडलं आहे. भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. तिथे सहाजिकच शिवसेनेचा दावा असणे हे स्वाभाविक होते, असे बोलले जात आहे. २०१९ मध्ये जयस्वाल हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणे जवळपास निश्चित होते. मात्र, रेड्डी यांनी या मतदारसंघावर दावा सांगून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच राज्यातील पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करतानाच टीकाही केली. त्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही आजची कारवाई आगामी काळात पक्षविरोधी कारवाया, बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या इतर पदाधिकारी, नेत्यांसाठी इशारा असल्याचे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT