मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने आज मोठा निर्णय देत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निकालावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
१९ वर्षांनीही प्रश्न तोच; मग बॉम्बस्फोट केला कोणी?
इम्तियाज जलील म्हणाले, एक मोठा प्रश्न आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर उभा राहतोय. निकालासाठी १५ ते १९ वर्ष लागतात आणि नंतर सर्वजण निर्दोष ठरतात? मग या काळात तुरुंगात असलेल्या लोकांचं नुकसान कोण भरून देणार?
एनआयएवर गंभीर आरोप
एनआयए आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना अटक केली. आज पुरावे नाहीत म्हणून आरोपी निर्दोष ठरले, पण हे बनावट पुरावे कोणी तयार केले? त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हिंदू अतिरेकी" संकल्पना आणि राजकीय लाभाचा आरोप
हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा तपास करताना ‘हिंदू अतिरेकी’ संकल्पना मांडली होती, याची आठवण करून देत जलील म्हणाले, “कम्युनल डिव्हाइड निर्माण करण्यासाठी हे मुद्दाम घडवून आणले गेले. साध्वी आणि आर्मी ऑफिसर यांना आरोपी बनवण्यात आले. नंतर भाजपने साध्वींना तिकीटही दिलं.”
सरकारवर टीका आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची मागणी
सरकार कोणाचंही असो, अतिरेकी कारवायांमध्ये सामील असलेल्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात पाच न्यायाधीश बदलले गेले, तरीही निकाल स्पष्ट नाही. सरकारने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायासाठी न्यावं,” अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.