Gondiya Accident News SaamTv
Video

Gondia Accident : शिवशाहीचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू; मृतांना आर्थिक मदतीचे आदेश | VIDEO

Shivshahi Bus Accident : सडक अर्जुनी तालुक्यात नागपुरकडून गोंदियाकडे येत असलेल्या शिवशाहीचा भीषण अपघात झाला आहे. यात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखम झाले आहेत.

Saam Tv

शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियामध्ये घडली आहे. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. या अपघातात आतापर्यंत 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गोंदियात झालेल्या एसटी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT