Narayana Rane and Eknath Shinde hold a crucial meeting in Konkan amid rising political tensions and allegations just before voting. Saam Tv
Video

ऐन निवडणुकीत कोकणात मोठी राजकीय घडामोड; राणे-शिंदे भेटीने युतीत खळबळ|VIDEO

Major Political Twist in Konkan: कोकणातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे–शिंदे यांची महत्त्वाची बैठक झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केल्यानंतर युतीत खळबळ उडाली असून मतदानाच्या तोंडावर ही चर्चा विशेष महत्त्वाची ठरत आहे.

Omkar Sonawane

कोकणात मतदानाच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

दरम्यान, निलेश राणे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे युती तुटल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच दोन दिवसापूर्वी निलेश राणे हे थेट एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी जात पैशांची बॅग दाखवली आणि भाजप पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत हे पैसे दिल्याचा झणझणीत आरोप त्यांनी चव्हाण यांच्यावर केल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या सर्व घडामोडींमुळे राणे–शिंदे बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT