Congress Saam tv
Video

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ, दिग्गजांना जमलं नाही ते सपकाळांनी करून दाखवलं

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीआधी युतीवर शिक्कामोर्तब होत आहे.

Namdeo Kumbhar

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना आतापर्यंत जे जमलं नाही ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दाखवलं आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा आज होणार आहे. डॉ.धैर्यवर्धन पुंडकर (प्रदेश उपाध्यक्ष),सिद्धार्थ मोकळे (प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख प्रवक्ता),चेतन अहिरे (मुंबई प्रदेशाध्यक्ष), स्नेहल सोहनी (मुंबई महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष), सागर गवई (मुंबई युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात याची घोषणा होणार आहे. ही युती फक्त मुंबईपुरतीच नव्हे तर राज्यभरात होऊ शकते, असे संकेतही मिळाले आहेत.

काँग्रेस-वंचित यांच्या युतीचे प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू होते. पण यश मिळत नव्हते. पण महापालिका निवडणुकीआधी या युतीवर शिक्कामोर्तब होत आहे. या घडामोडीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT