राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकाव्याच लागणार असून यासाठी महायुतीमधील सर्व घटक पक्षांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये बहुमत मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यात आली आहे. राज्यात बहुमत मिळवल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही. यासाठी शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही पक्षांनी कंबर कसली असली तरी मेगा प्लॅन भाजपकडून राबवण्यात येत आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यातून किमान ३० जागा जिंकून आणाव्या लागणार आहेत.
दरम्यान यात अजित पवार यांच्या गटाला सर्वाधिक निशाणा केले जात असल्याने त्यांच्या गटाला जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या असतील तर त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्याना कामाला लागावे लागणार आहे. आत्तापर्यंत केलेल्या सर्वेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त धोका हा अजित पवार यांच्या गटाला बसणार आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करण्यासाठी अजित पवार यांच्या गटाचा जास्त कस लागणार असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील अजित पवार यांच्या गटाला बसलेल्या फटक्यामुळेच महायुतीला कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे हा पराभव लक्षात घेऊनच यावेळी महायुतीकडून बैठकीत मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.