जालन्याच्या जनतेसाठी सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही महायुतीचे जालन्याचे नवनिर्वाचित आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. विधानसभेच्या जालना मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर विजयी झाले आहेत. 32 हजारांच्या फरकाने त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी आज सामवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
अर्जुन खोतकर यांनी जालना मतदारसंघातून आठव्यांदा निवडणूक लढवली आहे. यावेळी त्यांनी आपला चौथा विजय मिळवलाय. 2024 च्या विधानसभा निवडणूक मतदानात जालन्यामध्ये 63.63 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात बरेच फेरबदल घडले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले खोतकर सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले. माजी राज्यमंत्री असलेल्या खोतकर यांच्यावर पक्षाने उपनेते पदाची जबाबदारी दिली. खोतकरांना बळ देण्यासाठी निधी, नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत, मेडिकल कॉलेज, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी दिला गेला. त्याचाच फायदा त्यांना यावेळी झालेला दिसला आहे. त्याचबरोबर खोतकर यांच्या पत्नी यांनी देखील प्रचाराची धुरा सांभाळत प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन अर्जुन खोतकर यांचा प्रचार केला होता. यावेळी बोलताना खोतकर पुढे म्हणाले की, माझी आमदारकीची पहिली टर्म नाही. मला अनुभव असल्याने याचा फायदा मी माझ्या मतदारसंघाला कसा होईल हे पहिल. विरोधी पक्षाच्या आमदारांनी काम केलेलं नव्हतं त्यामुळे मी विजयी होणार यावर आम्हाला विश्वास होता. मला आमदारकी नवीन नाही, काय करावं काय नाही याची जान असल्याने मी जनतेसाठी सर्वोत्तम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असंही खोतकर यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.