खाते वाटपात भाजपच्या अनेक वजनदार नेत्यांना त्यांच्या मनासारखी खाती मिळालेली नसल्याचं बघायला मिळालं आहे. विशेषत: पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांना कमी वजनाची खाती मिळाली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातातलं महसूल खातंही गेलं आहे. तर संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या गिरीश महाजन यांच्या खात्यावरच आता संकट आलं आहे. शिंदे सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ग्राम विकास, क्रीडा, वैद्यकीय शिक्षण अशी तीन खाती होती. त्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा त्यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा खातं काढून घेण्यात आलं. आता महाजन यांना आपत्ती व्यवस्थापनासारखं खातं देण्यात आलं आहे.
2014 मध्ये पंकज मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास, ग्रामविकास अशी खाती होती. यावेळी त्यांना पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशूसंवर्धन ही खाती दिली आहेत. 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खातं होत. 2024मध्ये त्यांना जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) करण्यात आलं आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे2019मध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज अशी खाती सोपवण्यात आली होती. 2024 मध्ये मात्र त्यांना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन सारखी खाती देण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.