Uddhav Thackeray :  
Video

Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

Assembly Election: केलंय काम भारी, लुटली तिजोरी अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या जाहिरातीची खिल्ली उडवलीय. 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार, तेव्हा गद्दारांना खडी फोडायला पाठवणार असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय.कर्जतमधील सभेत ठाकरेंनी हा घणाघात केलाय. काय म्हणालेत ठाकरे पाहूया.

Tanmay Tillu

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची भर उन्हात कर्जतमध्ये सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर आणि त्यांच्या उमेदवारावर जोरदार निशाणा साधला. गुवाहाटीत टेबलावर नाचणाऱ्यांना आता परत गुवाहाटीला पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कर्जतकरांना केलं.

उद्धव ठाकरेंच्या निवडणूक कर्मचा-यांनी बॅग तपासल्यामुळे आधीच मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या कारचीही तपासणी करण्यात आली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बॅगा तपासणी चांगलीच गाजली. उद्धव ठाकरे त्यांनतर आक्रमक झालेत. सभांमधून टीका करत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर आसूड उगारला.या लोकांनी जनतेला धोके देऊन स्वतःला खोके घेतले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही हिशेब नाही. राज्यातील ज्या - ज्या ठिकाणी गद्दारी झाली त्या ठिकाणी हेच चित्रंय असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या उमेदवारांना लक्ष केलंय. यातून ठाकरेंच्या शिवसेनेला कितपत फायदा होणार यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT