Mahayuti leaders discussing the final city-wise alliance plan for upcoming Maharashtra municipal elections. Saam Tv
Video

मुंबई-ठाण्यात युती, पुण्यात 'एकला चलो रे'? आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला|VIDEO

Mahayuti Civic Poll Alliance Strategy: आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला असून मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक आणि नागपूर येथे युती तर पुणे-पिंपरीमध्ये स्वतंत्र लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये शिंदे सेना आणि भाजप युती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समजतं.

महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुती जिंकणार असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. नवी मुंबईबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या फॉर्म्युल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून महायुतीतील घटक पक्षांनी आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन हा रणनीतीचा भाग म्हणून असा निर्णय घेतल्याचं दिसतंय. आता यावर अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

एका दिवसात डायबेटीस गायब? डायबेटीस मुक्तीची संजीवनी सापडली

Samata Nagari Cooperative Credit Society: राज्यात ३० शाखा, ११०० कोटींच्यावर ठेवी अन् ठेवीदारांचा जीव टांगणीला, समता पतसंस्थेचा नेमका काय आहे प्रकार?

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT