मुंबई : बारामतीत पुन्हा एकदा महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळालाय. शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश उत्सावाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळे कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय.
यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवढे यांच्यामध्ये देखील बाचाबाची झाली. सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली होती. परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं. परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या, परंतु एकनाथ फेस्टिवलला आले नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या फोटो काळे कापड टाकले. अजित पवारांचा निषेध केल्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.