VidhanBhavan Andolan Saam TV
Video

Vidhan Bhavan Andolan : चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी | VIDEO

Chaddi Baniya Gang : महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे आमदार आणि नेते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीत होत असलेला उशीर, तसेच भ्रष्टाचाराचे आरोप या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो असे फलकही विरोधकांच्या हाती पाहायला मिळाले.

आंदोलनादरम्यान आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तातडीने कारवाईची मागणी केली. संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात हे अंदोलन करण्यात येत असून, सरकारने लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे विधान भवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अंदोलनाच्या वेळी नेते जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे हे देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार?

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची प्रवासावरील कार्यवाही अधिक तीव्र

Tuesday Horoscope: ५ राशींच्या हातात पैसा, काहींना प्रवासातून लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT