MNS News SaamTv
Video

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

Saam Tv

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाण्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाण्यातून चारही मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असून अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आता ठाण्यातील चारही मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. कोपरी, पाच पाखाडी, ठाणे शहर, ओवळा माजीवाडा, कळवा मुंबरा याठिकाणी मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे. ठाण्यात मनसेचं वर्चस्व कायम आहे. गेल्या काही दिवसात मनसेने ठाण्यात मोठ्याप्रमाणात काम केलं आहे. त्यामुळे ठाण्यातून सकारात्मक प्रतिसाद बघता इथून सर्व जागांवर मनसे उमेदवार देणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात देखील राज ठाकरे उमेदवार देणार आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे चांगले मित्र मांडले जातात. असं असतानाही आता त्यांच्या विरोधात ठाकरे उमेदवार देणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पुण्याच्या इंदापूर मधून तानाजी शिंगाडे यांना रासपची उमेदवारी

Voters Registration Last Date : आताही मतदार नोंदणी करता येईल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Jungle Trekking : जंगल ट्रेकिंगचा आनंद घ्यायचाय? मग वासोटा किल्ला आहे परफेक्ट ऑप्शन

VIDEO : भाजप आमदारांची जागा धोक्यात? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Pune News : मंत्री तानाजी सावंत यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार

SCROLL FOR NEXT