Rain Update Saam TV
Video

Maharashtra Rain Alert : आजही जोरदार पाऊस बरसणार, कोकण-ठाण्यात यलो अलर्ट | VIDEO

Yellow Alert : कोकण आणि ठाणे जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली असली, तरी पुढील काही तासातं हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं कोकण आणि ठाणे भागात यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट, सातारा घाट, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. विशेषतः सखल भागातील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी सतर्क राहावं, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT