Maharashtra Weather Update  Saam Tv
Video

Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या! यंदाचा मार्च तापदायक, उष्णतेची लाट येणार; यलो अलर्ट जारी

Yellow Alert For Konkan: राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होत चालली आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये कोकणासह मुंबई आणि पुणे तापले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Priya More

राज्याच्या विविध भागाताली तापमान वाढत चालले आहे. मार्च महिना खूपच त्रासदायक ठरणार आहे. कारण राज्यात मार्चमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणं गरजेचे आहे.

कोकणासह मुंबई आणि पुणे तापले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागामध्ये ३१ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. राज्यातील काही भागामध्ये दिवसा कडाक्याचे ऊन तर सकाळी आणि रात्री काहिसा थंडावा जाणवत आहे.

तसंच, मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी, मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा आणखी वाढणार असून ९ ते १५ दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT