Maharashtra Disaster Management Minister Girish Mahajan leaves for Uttarakhand to oversee rescue operations of stranded tourists. Saam Tv
Video

Uttarakhand Cloudburst: महाराष्ट्रातील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले, संकटमोचक गिरीश महाजन रवाना | VIDEO

Girish Mahajan Rescue Operation In Flood: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत.

Omkar Sonawane

उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले

पुणे, ठाणे, जळगाव, आंबेगाव, संभाजीनगर येथील नागरिक आपत्तीत

गिरीश महाजन यांनी तातडीने उत्तराखंडमध्ये जाऊन बचावकार्य सुरू केले

केंद्र सरकार व उत्तराखंड प्रशासनासह समन्वय साधून बचाव मोहिम सुरू

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या महाप्रलयामुळे अनेक नद्यांना पूर आल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीत महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. पुणे, आंबेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, ठाणे यांसारख्या जिल्ह्यांतील पर्यटक उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेले होते. मात्र, अचानक हवामान बदलल्यामुळे तेथील पूरस्थितीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक पर्यटक हे त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कातही नाहीत, अशी माहिती संबंधितांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने उत्तराखंडकडे रवाना होत रेस्क्यू ऑपरेशनची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. राज्यातील नागरिक सुरक्षितरित्या परत यावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांनी रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, राज्यातील एकही नागरिक अडचणीत राहू नये, यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि उत्तराखंड प्रशासनाशी समन्वय साधत आहोत. सर्व बचावकार्य काळजीपूर्वक आणि जलदगतीने पूर्ण केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT