Big Decision by Maharashtra Forest Department Saam tv
Video

Leopard: राज्यातील ६७ बिबटे ६ राज्यांना देणार, महाराष्ट्र वन विभागाचा मोठा निर्णय

Big Decision by Maharashtra Forest Department: राज्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. या वाढत्या बिबट्यांबाबत वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ६७ बिबटे ६ राज्यांना देण्यात येणार आहेत.

Priya More

महाराष्ट्र ६ राज्यांना ६७ बिबटे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र वन विभागाने राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या समस्येवर उपाय म्हणून ६ राज्यांना एकूण ६७ बिबटे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गुजरातमधील वनतारा येथे सर्वाधिक ५० बिबटे पाठवले जाणार आहेत. तसेच अरुणाचल प्रदेशला ६ तर बिहारला ५ बिबटे देण्यात येणार आहेत. मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित बिबटे इतर राज्यांनाही देण्यात येणार आहेत.

राज्यातील बिबटे ही गुजरातला पाठवले जाणार आहे. वन विभागाच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे ५० बिबटे गुजरातमधील वनताराला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनामध्ये करार झाल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्यांचे संवर्धन आणि मानवी संरक्षणाचे कारण पुढे करत वन विभागाने बिबटे इतर राज्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT