Maharashtra New Highway Saam Tv
Video

Highway: मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक द्रुतगती मार्ग, मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार सुसाट

Maharashtra New Highway: महाराष्ट्राला आणखी एक नवीन द्रुतगती महामार्ग मिळणार आहे. मुंबई ते हैदराबाद प्रवास सुसाट होणार आहे. हा महामार्ग मुंबई- कल्याण- लातूर- महाराष्ट्र- हैदराबाद असा असेल.

Priya More

मुंबईवरून लातूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच महाराष्ट्राला नवीन द्रुतगती महामार्ग मिळणार आहे. या महामार्गावरून लातूरपर्यंतचा प्रवास फक्त ४ तासांचा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या महामार्गाबद्दल माहिती दिली. हा महामार्ग तयार झाल्यानंतर थेट हैदराबादपर्यंतचा प्रवास सुसाट होईल.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'मुंबई- कल्याण- लातूर- महाराष्ट्र- हैदराबाद अशाप्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करत आहोत. आपल्याकडे मुंबईवरून हैदराबादला जाण्यासाठी एक महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाने जालना- नांदेड- निजामाबाद असं गेलो तर हा प्रवास ७१७ किलो मीटर आहे. मुंबई-पुणे-सोलापूर मार्गे गेलो तर ७०७ किलोमीटर प्रवास आहे. पण आपण जो नवीन महामार्ग तयार करतोय. या महामार्गामुळे हे अंतर फक्त ५९० किमीवर येणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लातूरपासून ते मुंबईपर्यंतचे अंतर साडेचार तासांचे होणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

SCROLL FOR NEXT