Swine Flu Saam TV
Video

Swine Flu Cases Rise in Maharashtra : राज्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव, रुग्णसंख्या २०४ वर|VIDEO

Mumbai Swine Flu : मुंबईत स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नागपूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूनंही डोकं वर काढले आहे. राज्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या २०४ वर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून, ४२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये ३६, पुण्यात 31, ठाण्यात 21, संभाजीनगरात 19, तर कोल्हापुरमध्ये 17 रुग्ण आढळले आहेत.

स्वाईन फ्लूमुळे नागपूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली असून सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, स्वच्छता पाळण्याचे व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. लक्षणे दिसताच तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT