Hasan Mushrif on Maharashtra Road. saam tv
Video

Video : गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे रस्ते खराब; फडणवीस सरकारमधील मंत्रीच नाराज

Maharashtra roads worse than Gujarat says Hasan Mushrif : महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरून फडणवीस सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गुजरातच्या रस्त्यांची तुलना महाराष्ट्रातील रस्त्यांशी केली.

Nandkumar Joshi

जेन झी अल्फाकडून महाराष्ट्रातील शहरं आणि गावागावांमधील रस्त्यांची पोलखोल केली जात असतानाच, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राचे रस्ते खराब असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

रस्त्यांची गुणवत्ता आणि कामांच्या दर्जाबाबत मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांच्या दर्जावर यापूर्वीही मुश्रीफ यांनी कठोर भूमिका घेतली होती.

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर मंत्री मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सूरतहून नागपूरकडे येत असताना रस्त्यांची दुरवस्था पाहून आपल्याला लाज वाटल्याचे ते म्हणाले. गुजरात सीमा ओलांडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्ते अत्यंत खराब असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही राज्यांच्या रस्त्यांची तुलना केली. लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या दर्जेदार कामांकडे लक्ष दिले नाही, तर जिल्ह्याचा विकास होणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांच्या दर्जाबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT