Maharashtra Rain Saam TV
Video

Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, कोकण विदर्भाला रेड अलर्ट | VIDEO

Red Alert : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.संभाव्य पूरस्थिती आणि नद्या-नाल्यांमध्ये पाण्याची वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

Gold Rate: आनंदाची बातमी! सराफा बाजारात सोन्याचे दर ९०० रुपयांनी घसरले, चांदीचीही चकाकी उतरली

Thane Accident : ठाण्यात सकाळी विचित्र अपघात, ५ ते ६ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; अनेक कारचा चुराडा; पाहा VIDEO

Kolhapur Tourism : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या पन्हाळा किल्ल्याजवळील गड, 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT