Bhaskar Jadhav On Vidhansabha  saam tv
Video

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेत्याला घाबरता का? अधिवेशन संपण्याआधी ठाकरे गट संतापला!

Maharashtra Assembly Session : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची अद्याप निवड करण्यात आली नाही. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Nandkumar Joshi

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन संपत आलं तरी, अद्याप विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, अद्याप निवड न झाल्याने स्वतः भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. उपाध्यक्षांची निवड करता, मग विरोधी पक्षनेतेपदाची निवड का केली नाही? माझ्या नावाची अडचण असल्यास माझ्या नावाचं पत्र मागे घेतो, अशी उद्विग्न भूमिका जाधव यांनी घेतली. तर विरोधी पक्षनेत्याला घाबरता का? असा सवाल अनिल परब यांनी केला आहे.

उपसभापतींची निवड करताय. विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली असती तर तुमच्या कामकाजाला चारचाँद लागले असते. कदाचित माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल तर मी खुलेआमपणे सांगतोय की, माझं पत्र मी आताच्या आता मागे घेतो. तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कुणाच्या नावाचं पत्र देतो. भास्कर जाधव नको, विरोधी पक्षनेता नको अशी धारणा ठेवू नका, असं भास्कर जाधव म्हणाले.

प्रथा-परंपरा कुठल्या त्या तर लिहून द्या. संख्याबळ किंवा प्रथा-परंपरांचं कारण असेल तर, तसं आम्हाला लिहून द्या. उद्या अधिवेशन संपतंय. विरोधी पक्षनेत्याची काय भीती आहे? विरोधी पक्षाला काय घाबरायचं आहे. कनिष्ठ सभागृहाला विरोधी पक्षनेता द्या, असं अनिल परब म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT