Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई, मतदारसंघात मोर्चेबांधणीसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक, VIDEO

Vidhan sabha election Uddhav Thackeray Mission Mumbai : विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी मिशन मुंबई सुरू केलंय. ३६ विधानसभांच्या मोर्चेबांधणीसाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी चांगली कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबईतील ३६ विधानसभांच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. दरम्यान मुंबईतील ३६ मतदारसंघांची जबाबदारी पक्षाचे १८ नेते आणि १८ सहायकांवर सोपविण्यात आल्याची माहिती मिळतेय.

या सहायकांना येत्या काही दिवसांत ३६ मतदारसंघांचा अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर करावा लागणार आहे. तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईसह राज्यातील इतर मतदारसंघांचे सर्वेक्षण अहवाल २५ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंकडे सादर केले जाणार आहेत. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी आहे. परंतु उद्धव ठाकरे अतिशय गंभीरपणे विधानसभेच्या तयारीमध्ये लागल्याचं दिसतंय. यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT