Mahavikas Aghadi CM candidate Face | महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  SAAM TV
Video

Maharashtra Politics : माविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?, VIDEO

maharashtra assembly election 2024 : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Nandkumar Joshi

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीकडून जागावाटपांबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा देखील सुरू केली आहे. अशात आता महाविकास आघाडीची सत्ता आली तर, मुख्यमंत्री कोण होणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केल्यानंतर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असेल, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मत दुर्लक्षित करण्यासारखं नाही, असं पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असतील, असा दावा केला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर त्याबाबत अधिक चर्चा होऊ लागली होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर स्वतः शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT